‘आणि 'नाम' सुरु होतं’ CC BY-NC-ND  — आसामच्या योरहाट जिल्ह्यामधला चुतीया समुदाय पिढ्या न् पिढ् बिहु गाणी गात आलाय. ढोलाच्या तालावर गायली जाणाऱ्या या गाण्यांमध्ये प्रेम, नव्या भातामुळे आलेलं सुख, लोककथा आणि इतरही बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 20 hr
लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीची माय मीराबाई उमप CC BY-NC-ND  — मातंग समाजात जन्माला आलेली एक लहानगी आपल्या आई-वडलांबरोबर गावोगावी हिंडत भिक्षा मागते आणि मोठी होऊन अख्ख्या समाजाचं प्रबोधन करते. आपल्या हातातल्या दिमडीच्या तालावर भीमगीत गात ती बाबासाहेबांचा संदेश सर्वदूर पोचवते. १४ एप्रिल २०२४ रोजी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने ही कहाणी खास तुमच्यासाठी ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 20 hr
मारीची मशीद आणि मझार CC BY-NC-ND  — मारीच्या या मशीद आणि मझारीची सगळी देखभाल गावातले हिंदू करतात. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातल्या या गंगा-जमुनी संस्कृतीची झलक या कहाणीत आणि चित्रफितीत पहा. रमझान ईदच्या निमित्ताने ही कहाणी खास तुमच्यासाठी ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 d
आंदोलक आशांना सरकारचं वचनः दिलासा का बोळवण? CC BY-NC-ND  — महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमधल्या आशा कार्यकर्त्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत. वेळेवर आणि वाढीव मानधन आणि त्याची मंजुरी देणारा जीआर या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. अलिकडे मुंबईच्या आझाद मैदानावरचं त्यांचं आंदोलन २१ दिवस चाललं. सरकारने त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचं कबूल केल्यानंतर त्यांनी ते मागे घेतलं पण गेल्या सहा महिन्यांमधलं हे तिसरं आश्वासन आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढणाऱ्या या लढवय्या आशांची ही गोष्ट ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 6 d
धार्मिक ध्रुवीकरणाला मळगावचं चोख उत्तर CC BY-NC-ND  — विविध धर्मांचे लोक अनेक शतकांपासून समन्वयाने एकत्र उपासना करतात अशा प्रार्थनास्थळांवर हिंदुत्ववादी गटांकडून हल्ले वाढू लागले असताना एका गावाने अगदी ठामपणे दाखवून दिलं की एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहणं शक्य आहे ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 6 d
रायपूरच्या वीटभट्ट्यांवर ‘वोट’ आजही कोसो दूर CC BY-NC-ND  — काम आणि सगळ्याच परिस्थितीमुळे छत्तीसगडच्या या कामगारांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाच्या तारखा कधी आहेत हे देखील नीटसं माहीत नाही ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 6 d
‘आम्हाला काय लागतं, काय हवंय ते विचारा ना’ CC BY-NC-ND  — गडचिरोलीतल्या घनदाट जंगलांमध्ये राहणाऱ्या आदिवासींची राहती गावं आणि संस्कृती दोन्ही इथल्या लोहखनिजाच्या खाणींनी उद्ध्वस्त केलीये. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हाच मुद्दा घेऊन इथल्या १,४५० ग्रामसभांनी आपल्या अटी-शर्तींवर काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 6 d
शंभू सीमेवरच्या शेतकरी महिला CC BY-NC-ND  — अख्ख्या पंजाबातले शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत, शंभू सीमेवरची ही काही दृश्यं ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 1 w
झारखंडमध्ये पैटकर चित्रांचे विरते रंग CC BY-NC-ND  — पैटकर चित्रकलेत चित्र, गोष्ट आणि गाण्यांमधून गावातल्या जगण्याच्या, निसर्ग आणि मिथकांच्या गोष्टी सांगितल्या जातात. झारखंडच्या आमाडोबी गावात ही चित्रं काढणारे अगदी मोजके कलाकार सांगतात की मोबाइल फोनवर सहज पाहता येणाऱ्या व्हिडिओंमुळे त्यांच्या कलेपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 1 w
वेगळी लैंगिकता, साधी माणसं, रोजचं जगणं CC BY-NC-ND  — जून हा प्राइड महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पारी ग्रंथालय महानगरांच्या झगमगाटापासून दूर गावपाड्यात राहणाऱ्या वेगळी लैंगिकता असलेल्या लोकांच्या रोजच्या जगण्याचा मागोवा घेत आहे. वैयक्तिक आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी देखील वाट्याला येणारा नकार आणि भेदभावाच्या या कहाण्या आहेत ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 1 w
'मी जशी आहे तसं सगळ्यांनी मला स्वीकारलंय' CC BY-NC-ND  — इरुलर समुदायातली तुलसी तिरुनंगई म्हणजेच पारलिंगी समाजाचा भाग आहे. रोजंदारी करून, देवळांमधल्या पूजाविधींमध्ये सहभागी होत, झाडपाल्याची औषधं देत ती आपल्या मुलीचा एकटीने सांभाळ करत आहे. ३१ मार्च - पारलिंगी व्यक्तींविषयी जागृती दिनानिमित्ताने तुलसीची गोष्ट ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 1 w
आम्ही श्रमतो अन्नासाठी, सन्मानासाठी CC BY-NC-ND  — १ मे. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस. भारतात श्रमिकांची आता काय अवस्था आहे हे दाखवणारे चार अहवाल आम्ही सादर करत आहोत. या अहवालांमधून श्रमिकांना भेडसावत असलेली विषमता आणि त्यातही त्यांची एकजूट यावर भर देण्यात आला आहे ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 1 w
आश्वासनांच्या पूर्ततेसाठी शेतकरी पुन्हा राजधानीत CC BY-NC-ND  — १४ मार्च २०२४ रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि कामगारांची किसान महापंचायत भरली. शेतकऱ्यांना महिला शेतकऱ्यांच, शाश्वत आणि समन्यायी उत्पन्न देण्याचं आपलं वचन केंद्र सरकारने पूर्ण करावं ही त्यांची प्रमुख मागणी होती. ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 2 w
पुसेसावळीत जीवघेण्या अफवा आणि अपप्रचार CC BY-NC-ND  — हिंदुत्ववादी माथेफिरू महाराष्ट्रात धार्मिक ताणतणाव आणि हिंसाचार पसरवतायत. फोटोशॉप केलेल्या इमेजेस आणि अफवा पसरवायच्या आणि त्या जोरावर मुसलमानांच्या मालमत्ता लुटायला आणि जिवावर उठायला हे लोक मागेपुढे पाहत नाहीत ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 2 w
ને હાજાસર હીબકે ચડે છે… CC BY-NC-ND  — ઓઢો જામ અને હોથલ પદમણી કચ્છની જૂની અને અતિ પ્રખ્યાત લોકવાર્તા પર આધારિત આ ગીત છે પ્રિયજનના વિચ્છેદની વેદનાનું ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
തോൽ‌പ്പാവക്കൂത്തുകാർ കലയെ നവീകരിക്കുന്നു CC BY-NC-ND  — പുതിയ കാലത്തെ പ്രേക്ഷകരുടെ രുചിഭേദങ്ങളെ തൃപ്തിപ്പെടുത്താ‍നായി, കഴിഞ്ഞ രണ്ട് ദശാബ്ദങ്ങൾക്കുള്ളിൽ, തോൽ‌പ്പാവക്കൂത്ത് കലാരൂപത്തെ വളരെയധികം നവീകരിച്ചിട്ടുണ്ട് ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
पारी ग्रंथालयः विदा, अहवाल आणि बरंच काही CC BY-NC-ND  — गेल्या १२ महिन्यात पारीच्या ग्रंथालयात शेकडो अहवाल, सर्वेक्षणं आणि अक्षरशः हजारो शब्दांचं काम झालं. आणि या सगळ्यांचा उद्देश केवळ एकच, न्याय आणि अधिकारांना भक्कम पाठिंबा ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
सुंदरबन : आपत्ती नि वन्यजीवांच्या पलीकडलं CC BY-NC-ND  — ज्योतिरिंद्र नारायण लाहिरी यांचं ‘सुधू सुंदरबन चर्चा’ हे त्रैमासिक जगातल्या सगळ्यात मोठ्या कांदळवनाला वाहिलेलं आहे. मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांनी साकारलेल्या सुंदरबनाविषयीच्या रूढ विचारचौकटीला हे त्रैमासिक छेद देतं ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
मोह, मनरेगा आणि स्थलांतरावर गोंदियाच्या गरिबांची मदार CC BY-NC-ND  — देशातल्या गरिबातल्या गरिबांची मदार आजही मोह आणि तेंदूसारखं वनोपज आणि मनरेगाखाली मिळणाऱ्या रोजगारावर आहे. आज १९ एप्रिल रोजी गोंदिया मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान होणार आहे पण इथल्या अरततोंडी गावातल्या आदिवासींचं म्हणणं मात्र इतकंच की गेल्या १० वर्षांत त्यांचं आयुष्य जास्तच खडतर झालंय... ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
भंडाऱ्यामध्ये अवचित आणि अघटित घटनांची मालिका CC BY-NC-ND  — महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात तरुणांना रोजगार नाही म्हणून परराज्यात कामासाठी जावं लागतं. त्यांच्या या संघर्षात २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचा विचार सगळ्यात शेवटी येतो ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
Farming and its Crisis CC BY-NC-ND  — The troubled world of agriculture ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
पाणी कुठे गेलं गं बाई? CC BY-NC-ND  — उन्हाची काहिली वाढत चाललीये आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पाण्याची टंचाई आणि त्याला लागून येणारा ताणही वाढू लागला आहे. २२ मार्च रोजी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याचा मूलभूत हक्कही मूठभरांनाच मिळतो आणि बहुसंख्यांचा डावलला जातो, याचं चित्र पारीवर मांडण्याचा हा प्रयत्न ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
নির্জন গ্রামে অলৌকিকের পথ চেয়ে একাকী এক বৃদ্ধ CC BY-NC-ND  — গোটা একখানা গ্রাম, মাত্র আট বছর আগেও যার জনসংখ্যা ছিল ১,১৩৫। তামিলনাড়ুর থুথুকুড়ি জেলার মীনাক্ষীপুরম গ্রামে আজ এস. কন্দসামিই একমাত্র অধিবাসী। এক তীব্র জলসংকটের জেরে বাদবাকি সব্বাই আজ গাঁ-ছাড়া ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
दिल्लीत किसान मजदूर महापंचायत संपन्न CC BY-NC-ND  — १४ मार्च २०२४ रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात हजारो शेतकरी आणि शेतमजूर महापंचायतीसाठी जमले होते. सरकारला तीन वर्षांपूर्वीच्या आंदोलनानंतर दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देणं हा या शांततापूर्ण रॅलीचा हेतू होता, जी अद्याप पूर्ण झाली नाहीत ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
‘कवितेनं काय होणार,’ तुम्ही ती ऐकणंच थांबवलंत तर? CC BY-NC-ND  — आज जगाला प्रेमाची, अंधार नष्ट करणाऱ्या उजेडाची गरज असताना आपण मात्र कवितेपासून दूर चाललोय. हे चांगलं नाही असं देहवाली भिली भाषेत लिहिणारा कवी आपल्याला सांगतोय ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
‘मी कचरा उचलते म्हणून मला कचरा समजू नका’ CC BY-NC-ND  — २ ऑक्टोबर हा स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. पुण्यातल्या कचरावेचक महिला त्यांच्या जगण्याविषयी कामाविषयी या फिल्ममध्ये बोलतायत ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
ಪಿಲಿ ವೇಷ: ತಾಸೆಯ ಪೆಟ್ಟಿಗೆ ಕುಣಿತ CC BY-NC-ND  — ಈ ಜಾನಪದ ಕುಣಿತವನ್ನು ಕರಾವಳಿ ಕರ್ನಾಟಕದ ಯುವಕರು ಮೈಚಳಿ ಬಿಟ್ಟು ಕುಣಿಯುತ್ತಾರೆ. ಸ್ಥಳೀಯರಿಂದ ಚಂದಾ ಎತ್ತಿ ಆಯೋಜಿಸುವ ಈ ಕುಣಿತ, ದಸರಾ ಮತ್ತು ಜನ್ಮಾಷ್ಟಮಿ ಉತ್ಸವಗಳ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗವಾಗಿದೆ ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
‘राबणारे हात रिकामे ते रिकामेच’ CC BY-NC-ND  — पश्मिना उत्पादनांसाठी सूतकताईचं अत्यंत कुशल काम करणाऱ्या महिलांच्या पदरी पडते अतिशय तुटपुंजी कमाई. आता तर तरुण पिढीने या पारंपरिक व्यवसायाकडे जवळपास पाठच फिरवली आहे ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
जात्यावरची ओवीः गीत, संगीत आणि बरंच काही CC BY-NC-ND  — महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेकडो गावातल्या ३००० हून अधिक बायांनी गायलेल्या एक लाखाहून जास्त ओव्यांचा हा प्रकल्प म्हणजे साध्यासुध्या बायांचा आवाज ऐकण्याचा, टिपण्याचा अचाट प्रयत्न आहे. शेती, मजुरी, मासेमारी आणि इतरही किती तरी कामं करणाऱ्या या बाया आई, बहीण, बायको आणि सुना बनून जात्यापाशी गाणी गात आल्या आहेत. त्यांचं हे गाणं म्हणजे जात्यावरची ओवी. या प्रकल्पाची सुरुवात, उगम आणि या काव्यमय ठेव्याचा प्रवास उलगडून दाखवणारी पारीची ही फिल्म जरूर पहा ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
पलामूमध्ये 'शेतकऱ्याची फिकीर कुणाला?' CC BY-NC-ND  — झारखंडच्या पलामू जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे छोटे आणि सीमांत शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. शेतीला पाणी देणाऱ्याला आम्ही मत देणार असं त्यांचं म्हणणं आहे ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 3 w
महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका संपावर CC BY-NC-ND  — निवृत्तीवेतन आणि वाढीव मानधनासह, सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्रभरातल्या अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 4 w
अहमदाबाद के चलनी बनेइय्या मोहम्मद CC BY-NC-ND  — ये कहिनी कतको किसिम के अनाज अऊ पिसान ला चाले सेती बऊरेइय्या चलनी बनेइय्या के रोज के जिनगी ला दिखावत हवय. गुजरात के स्मार्ट सिटी के कोनहा मं परे ये कारीगर ला गुजारा सेती कइसने जूझत परत हवय ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 4 w
प्रवास स्‍वतःच्‍या शोधाचा CC BY-NC-ND  — लैंगिक आणि लिंगाधारित हिंसाचार वेगवेगळ्या रूपात आपल्‍यासमोर येऊ शकतो. आपली लैंगिक ओळख मिळवण्‍यासाठी सुमितने केलेला प्रवास खूपच खडतर होता. कुटुंबाचा ठाम विरोध ते न्‍याय वैद्यकाचा लाल फितीचा कारभार, अशा वेगवेगळ्या टप्‍प्‍यांतून गेलेल्‍या सुमितचा हा प्रवास संपलेला मात्र नाही… ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 4 w
नोकरी हाच आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न! CC BY-NC-ND  — २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आणि १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. भंडाऱ्याच्या शिवाजी स्टेडियममध्ये ग्रामीण भागातील तरुण सरकारी नोकरीच्या तयारीसाठी प्रशिक्षण घेताना दिसतात पण इथे सध्या बेरोजगारी आणि चिंतेचे वातावरण आहे. भविष्य सुरक्षित करण्यासाठी मेहनत करणाऱ्या या तरुणांसाठी निवडणुकीतील आश्वासने नाही तर नोकरी मिळणे हा प्राधान्याचा विषय आहे. '२०२४ः निवडणूक गावाकडची' या मालिकेचा हा पहिला लेख ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 4 w
सुन लो के अभी मैं ज़िंदा हूं! CC BY-NC-ND  — विस्थापनाचे बळी ठरलेल्या दलित आणि आदिवासी मुलांसाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या एका शिक्षक कवीच्या मनातली अस्वस्थता मांडणारी कविता ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 4 w
अयोध्येचा देव आणि देवमाणसं CC BY-NC-ND  — नव्याने बांधण्यात आलेल्या भव्यदिव्य राममंदिराच्या आजूबाजूला दशकानुदशकं अनेक हिंदू आणि मुस्लिम कुटुंबं एकत्र नांदत आली आहेत. कुरेशी आणि सैनी कुटुंबीय त्यांच्या मैत्रीविषयी, घनिष्ठ संबंधांविषयी आपल्याला सांगतायत. मात्र मंदिरनिर्माणानंतर कोट्यवधींचा महापूर आणि विकासाचा वरवंटा त्यांच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचलाय ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 4 w
लाड हाइको CC BY-NC-ND  — हो आदिवासी शेतकरी बिरसा हेमब्रोम यांची माशाची पाककृती ... पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया 4 w